

'चोरून' करत असलेले व्यसन लपविण्यासाठी अशा व्यक्ती 'टोक' गाठतात.परिणामी त्यांच्यातील असे अनेक 'स्वभावदोष' गडद होत जातात. या वर्तनामुळे स्वतःहून व्यसन सोडणे कठीण होत जाते...आणि अनिच्छेने व्यसन सोडणे जवळपास अशक्यच! म्हणून या परिस्थितीत 'Lock n' Key' हा मार्ग उपयुक्त ठरतो. ...मात्र हे घरच्या घरी शक्य होत नाही.कारण अचानक अंमली पदार्थाचे सेवन बंद झाल्यावर, 'वियोग लक्षणे' दिसायला सुरवात होते.या बाबतीत घरातील व्यक्ती 'अनभिज्ञ ' असल्याने, एकतर गोंधळून जातात किंवा घाबरतात. बऱ्याचदा व्यसनी व्यक्तीला होणार त्रास थांबवा म्हणून कुटुंबियांकडून / मित्रमंडळींकडून त्याला 'तो' सेवन करत असलेला अंमली पदार्थ पुरविला जातो. आणि...व्यसनमुक्तीच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल तिथेच रुतून बसतं. अशावेळी आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रात' दाखल करणे हेच योग्य आहे, इथे अशा रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. 'वियोग लक्षणे' असली तरी तज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधे दिली जातात.प्रत्येकाच्या शरीर स्वास्थ्यानुसार ज्याची त्याची औषध योजना आखली जाते. अशा व्यक्ती जेव्हा या त्रासातून बाहेर येतात तेव्हा त्यांना आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव होते. Best Rehabilitation center in Pune
We hate spam too.