https://www.aatmanirbharpune.in
917498409308

आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्र व्यसनमुक्तीचे तं...

आत्मनिर्भर
2022-02-04T16:51:19
Aatmnirbhar Deaddiction Cen 7498409308
आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रव्यसनमुक्तीचे तं...

आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्र व्यसनमुक्तीचे तंत्र.... 'व्यसन' हे अनेक पदार्थांचं केलं जातं; त्याच बरोबर अंमली पदार्थही अनेक आहेत.तसंच या पदार्थांचं सेवन करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.आणि सर्वात महत्वाचं हे सर्व पदार्थ हनिकरकच आहेत. प्रत्येक अंमली पदार्थ हा आरोग्यासाठी घातक आहे, हे माहीत असूनही आपल्या आयुष्यात जीवन शैलीतील बदलांमुळे 'दारू आणि तंबाखू' चा अलगत शिरकाव झालेला आहे असे दिसून येते.याचे कारण म्हणजे व्यक्तिपरत्वे या अंमली पदार्थांबाबत झालेली मते, गैरसमज आणि समर्थन. 'दारू' ही 'स्लो पॉयझन' आहे असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो, तरीही हे खरं आहे. पहिल्यांदा दारू पिणाऱ्यांपैकी 15 ते 25 टक्के लोक हे पुढे जाऊन दारूच्या व्यसनात अडकतात.आजच्या आधुनिक जीवनसरणीत दारूने अलगत प्रवेश केला आहे. आज ...स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृद्ध या सगळ्यांनाच ती प्रिय आहे. मात्र दारू कुणावरही प्रेम करत नाही; आणि म्हणूनच हा 'गोड विषय' (?) सोडून देण्यातच भलाई आहे.नाहीतर व्यसनी व्यक्तीवर पश्चाताप करण्यासाठीसुद्धा वेळ शिल्लक रहाणार नाही. हे सगळं कितीही खरं असलं तरी, जो पर्यंत या विषयाची जाणीव होत नाही तो पर्यंत व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल पडत नाही. व्यसनी व्यक्तीला बऱ्याचवेळा त्याच्या नातलगांकडून, कुटुंबियांकडून, हितचिंतकांकडून व्यसन सोडण्या बाबतचे सल्ले दिले जातात. बहुतांशीवेळा यात मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे व्यसनी व्यक्तीला व्यसन सोडणे शक्य होत नाही.याउलट त्याला असा सल्ला देणाऱ्यांविषयी मनात 'तेढ' निर्माण होते, व 'तो' अशा सबंधितांना टाळू लागतो. या परिस्थितीत व्यसनी व्यक्तीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कोणते तंत्र अवलंबिले पाहिजे या विषयी जाणून घेऊ.... सर्वप्रथम व्यसन करणाऱ्या व्यक्तीची व्यसन सोडण्याची इच्छा कितपत आहे हे जाणून घ्यावे. स्वेच्छेने व्यसन सोडण्यास अपवादात्मक व्यक्तीच तयार असतात. इतर व्यक्ती या बऱ्याचवेळा, "मी पुन्हा व्यसन करणार नाही." असा बुरखा पांघरतात.अशा वागण्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत कमालीचा बदल घडतो. 'चोरून' करत असलेले व्यसन लपविण्यासाठी अशा व्यक्ती 'टोक' गाठतात.परिणामी त्यांच्यातील असे अनेक 'स्वभावदोष' गडद होत जातात. या वर्तनामुळे स्वतःहून व्यसन सोडणे कठीण होत जाते...आणि अनिच्छेने व्यसन सोडणे जवळपास अशक्यच! म्हणून या परिस्थितीत 'Lock n' Key' हा मार्ग उपयुक्त ठरतो. ...मात्र हे घरच्या घरी शक्य होत नाही.कारण अचानक अंमली पदार्थाचे सेवन बंद झाल्यावर, 'वियोग लक्षणे' दिसायला सुरवात होते.या बाबतीत घरातील व्यक्ती 'अनभिज्ञ ' असल्याने, एकतर गोंधळून जातात किंवा घाबरतात. बऱ्याचदा व्यसनी व्यक्तीला होणार त्रास थांबवा म्हणून कुटुंबियांकडून / मित्रमंडळींकडून त्याला 'तो' सेवन करत असलेला अंमली पदार्थ पुरविला जातो. आणि...व्यसनमुक्तीच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल तिथेच रुतून बसतं. अशावेळी आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रात' दाखल करणे हेच योग्य आहे, इथे अशा रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. 'वियोग लक्षणे' असली तरी तज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधे दिली जातात.प्रत्येकाच्या शरीर स्वास्थ्यानुसार ज्याची त्याची औषध योजना आखली जाते. अशा व्यक्ती जेव्हा या त्रासातून बाहेर येतात तेव्हा त्यांना आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव होते. शरीरातून अंमली पदार्थाचा अंश दूर झाल्यावर...त्याला एकाचवेळी अनेक गोष्टींची जाणीव होत असते.झालेल्या चुकांबाबत मनात खंत, पश्चातापाची भावना जन्म घेते.'इथेच' अशी व्यक्ती पुन्हा घसरण्याची दाट शक्यता असते, आणि म्हणूनच त्याला समुपदेशन महत्वाचे ठरते. 'समुपदेशन' म्हणजे एखाद्याला उत्तम सल्ला देणे, ज्याद्वारे समस्येवर पर्याय निघेल आणि त्याचा सर्वांनाच लाभ होईल. 'आत्मानुरभर व्यसनमुक्ती केंद्रात' याप्रकारे समुपदेशनाचे कार्य चालते.इथे समुपदेशक व समस्येसंबंधीत व्यक्ती (व्यसनीव्यक्ती/त्याचे नातेवाईक) एकत्र पणे समस्येवर चर्चा करून मार्ग निवडतात. प्रथम समुपदेशक समस्या नीट ऐकून घेतात, व आपल्या अनुभवाने, बुद्धीचातुयाने , सद् विवेक बुद्धीने उपाय, पर्याय सांगून मार्गदर्शन करतात. # ही कार्यपद्धती माहीत नसलेले अनेकजण या विषयी शंका उपस्थित करतात की, "याचा कितपत फायदा होईल..?" या प्रकारच्या उपचारांचा लाभ लवकरच दिसून येतो, कारण विचार बदलून जातात. जगाकडे, स्वतःकडे, स्वतःच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. समस्या नेमकी का उदभवली..? त्यातून बाहेर कसे पडत येईल..? याचा नीट विचार करता येतो. समुपदेशकाकडे बरेच ज्ञान व अनुभव असतो.सकारात्मक दृष्टिकोन असतो. तुम्ही स्वतःकडे , स्वतःच्या समस्येकडे ज्या दृष्टीने पाहतां , त्याहून वेगळी दृष्टी त्याच्या कडे असते. शिवाय छोट्या छोट्या टिप्स मुळे भोवतालची परिस्थिती बदलता येईल ...या प्रकारच्या टिप्स समुपदेशक देतात. त्यामुळे व्यसनी व्यक्तीची/त्याच्या कुटुंबियांची मते, विचार बदलतात. परिस्थिती आटोक्यात येते. 'आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रात' नव्याने दाखल झालेल्या व्यक्तीला...इतर, अनेक उपचार घेत असलेले, उपचार पूर्ण झालेले तसेच पुन्हा नव्याने दाखल होणारे ..यांचे दर्शन घडत असते. व्यसनावर मात करून पुन्हा सामाजिक प्रवाहात आलेल्यांच्या यशाने, त्यांच्या अनुभवाने त्यांना प्रेरणा मिळते. नव्याने दाखल झालेल्या रुग्णांची वर्तणूक पाहतां त्यांना आपल्या भूतकाळातील चूका आठवतात. या चुकांच्या आठवणींनी सुद्धा त्यांना वेदना होतात. 'आत्मनिर्भरच्या' उपचार पद्धतीत स्वावलंबनाचे तंत्र अवलंबिले आहे. स्वतःची कामे स्वतः करण्यासाठी स्वयंप्रेरणा असावी लागते, जी अंमली पदार्थांच्या सेवनाने जवळपास नाहीशी झालेली असते. इथे स्वतः काम करताना मेंदूतील प्रेरणदायी रसायने पुन्हा तयार होऊ लागतात.त्यामुळे अशा व्यक्तीला अंमली पदार्थाच्या सेवनाचे विसर पडू लागतो. हातातील किंवा स्वीकारलेले काम/जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद अनुभवता येतो. म्हणजेच Happy Hormone पुन्हा एकदा नैसर्गिकरित्या पाझरत आहेत हे कळून येते. यापूर्वी मनात 'आनंदीभाव' तयार होण्यासाठी व्यसन करण्याची इच्छा निर्माण होत होती, तोच अनुभव व्यसनाशिवाय अनुभवता येऊ लागतो. या उपक्रमाच्या जोडीला मानसोपचार, तज्ञांचे मार्गदर्शन खूप फायदेशीर ठरते. ' व्यसन म्हणजे जिवंत मरण ' अनुभवलेल्या व्यक्तीला उपचार पूर्ण झाल्यावर ; निकोप मानसिक व शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली सापडते. Rehabilitation Center in Pune

Message Us

Keywords

बतपैसोजोोतबिुतसबतोमीज्ानोनसतेरहाथेनेष्जीजगगववनतसयारितविषारारुगतिथनाततेढिताहेतहताबवाजातरासतपतरतातात्तीपुनतरीतुमनुसाहतविवदनाजरीसद्स्यसुदगूनयपदपायसमस्तमयतागोषिषयवातदूरKeyजिवबनापस्थ्रमायेवरPuneास्थLockवदोषगुरुातापोरूनप्रिे सगनाहीमाजितीवरिप्सत्वास्वीविसरप्रतादातदारूमतीनहीतरपुरुष्यसनारोग्यमात्रवर्तनसातूनयोजना्यसनीद्रातबरोबरार्गदनिकोपसूनहीतर गोवियोगयसनमुव्यसनप्रेममाहीतार पद्पाहिजेपयुक्तत्मनिर्तिपरतमित्रमसमर्थनस्त्रीगैरसमजसा बुरहे सर्वनैसर्गिपदार्थाापूर्वीसे दिसूनस्वतःहूनयुवावर्गे पुढे जायसनापासूनसर्वप्रथमपरिस्थितीतम/जबाबदारीHappy HormoneRehabilitation Center

other updates

Book Appointment

No services available for booking.

Select Staff

AnyBody

Morning
    Afternoon
      Evening
        Night
          Appointment Slot Unavailable
          Your enquiry
          Mobile or Email

          Appointment date & time

          Sunday, 7 Aug, 6:00 PM

          Your Name
          Mobile Number
          Email Id
          Message

          Balinese massage - 60 min

          INR 200

          INR 500

          services False False +918048032928